शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रोपवनात शाळकरी मुले बागडताना पाहण्यासाठी भारतीताईंचे विशेष प्रयत्न

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 28, 2021 | 11:00 am
in इतर
0
b

नंदुरबार – नंदुरबार जवळील बंधारपाड्याच्या रोपवाटिकेत भारती सयाईस सहजपणे वावरताना दिसतात. प्रत्येक रोपाकडे पाहताना त्यांच्या नजरेतला आपलेपणा स्पष्टपणे दिसतो. परिसरातील रोपांविषयी त्या भरभरून बोलतात. एक स्त्री म्हणून त्या रोपांविषयी असलेली मातृत्वाची  आणि स्नेहाची भावना त्यांच्या कार्यातून दिसते. रोपवाटिकेच्या ओसाड परिसरात रोपवनाची निर्मिती त्यांनी केली आहे. या रोपवनात शाळकरी मुलांना बागडताना पाहण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करीत आहेत.
भारती गेल्या तीन वर्षापासून या रोपवाटिकेत वनपाल म्हणून काम पाहत आहेत. जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाची ही सर्वात मोठी रोपवाटिका आहे. त्याचे व्यवस्थापन सांभाळताना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या संकल्पनेनुसार त्यांनी खडकाळ भागावर मनरेगा अंतर्गत रोपवन उभारण्याचे आव्हान स्वीकारले आणि तातडीने ते अंमलातही आणले. त्यासाठी आवश्यक खड्डे त्यांनी तात्काळ तयार केले.
Ndr Amhi Saryajani 28 Feb 2
टोकरतलाव काठच्या या भागात ८०० झाडे लावली  आहेत आणि त्यातली १०० टक्के झाडे वाढत आहेत.  विशेष म्हणते अधिकांश झाडे वड आणि पिंपळाची आहेत. परिसरातील स्थानिकांना फळझाडे  लावण्यासाठी त्या प्रोत्साहित करतात. रोपवाटिकेचा परिसर निसर्गरम्य व्हावा यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. 
रोपवाटिकेत लहानशी बाग तयार करून त्यात कमळासाठी विशेष कुंड तयार करण्याची कल्पकता असो वा रोपवनातील झाडे वाढण्याकडे जातीने लक्ष देणे असो, परिसर हिरवागार होऊन शाळेच्या मुलांनी तिथे भेट द्यावी असा त्यांचा प्रयत्न आहे. रोपवाटिकेसाठी गतवर्षी सोलर पंपही बसविण्यात आला आहे. 
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १४ लाखापेक्षा अधिक रोपे तयार करण्याचे आव्हानात्मक काम त्यांनी केले. अचानक उद्दीष्ट प्राप्त झाल्यावरही न डगमगता त्यांनी स्थानिक मजुरांशी संवाद साधला आणि त्यांचा सहभाग मिळविला. पाण्याची कमतरता असताना रोपे जिवंत राहतील आणि त्यांचे वाटप गावपातळीवर होईल याची विशेष दक्षता त्यांनी घेतली. पाण्याच्या नियोजनासाठी त्यांनी विशेष कष्ट घेतले. वड-पिंपळाची रोपे तयार करण्याचे कठीण असणारे काम त्यांनी मजुरांच्या सहकार्याने केले. 
आज रोपवाटिकेत ३० ते ३५ प्रकारची रोपे तयार होतात. २०२१ साठी २ लाख रोपे तयार असून एक लाख रोपांची नव्याने तयारी सुरू आहे. त्यांना वनरक्षक सविता धनगर आणि वनमजूर शफी खाटीक याचे सहकार्य मिळत आहे. स्थानिकांना वृक्षाच्या माध्यमातून उपजिविकेचे साधन मिळावे अशी इच्छा बाळगून त्यादिशेने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
आपला स्वभाव आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे रोपवाटिकेतील मजुरांना त्या आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाटतात आणि हेच त्यांच्या कामातले खरे यश आहे. त्यांच्या नजरेतले रोपवन उभे करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना म्हणूनच सर्व मजुरांचे मनापासून सहकार्य मिळते. त्यांनी रोपवन तयार होईपर्यंत त्याचठिकाणी राहावे ही मजुरांची प्रेमळ प्रतिक्रियाही त्यामुळेच असावी.
 निसर्ग संरक्षणात सहभाग घ्यावा
वृक्ष लागवडीत महिलांचा सहभाग वाढवायचा आहे. त्यांना संगोपनाची कला मुळातच अवगत असते. त्यातून उघड्या-बोडक्या डोंगरावर हिरवाई यावी असे मनापासून वाटते  आणि त्यासाठी काम करायला आवडेल. रोपवनातून शाळकरी मुलांनी माहिती घ्यावी आणि निसर्ग संरक्षणात सहभाग घ्यावा यासाठी ते वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
–भारती सयाईस, वनपाल

……

रोपवन दृष्य स्वरुपात येत आहे
भारती यांना रोपवाटिका तयार करण्याचा चांगला अनुभव आहे. विशेष म्हणजे आपल्या कामासाठी इतरांचे सहकार्य मिळविण्याची कला त्यांना अवगत आहे. आपली जबाबदारी मनापासून पार पाडण्यात आनंद मानतात आणि म्हणूनच रोपवन दृष्य स्वरुपात येत आहे.
–  स्नेहल अवसरमल, वनक्षेत्रपाल
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्फोटकांनी भरलेल्या ती कार  बाहेर टोल नाक्यावर दिसली…

Next Post

…तर जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा; दातार जेनेटिक्सचे खुले आव्हान

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

...तर जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा; दातार जेनेटिक्सचे खुले आव्हान

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 6

उत्तरकाशीमधून महाराष्ट्रातील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट…राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

ऑगस्ट 9, 2025
jail11

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑगस्ट 9, 2025
RUPALI

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले हे पत्र

ऑगस्ट 9, 2025
प्रातिनिधिक फोटो

रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट

ऑगस्ट 9, 2025
fir111

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 9, 2025
crime11

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011