नाशिक – भारतीय साहित्य, कला, संगीत, चित्रपटाबरोबरच पाश्चात्य संस्कृतीचीही अनुभूती घ्यायला हवी. ज्ञानदाना बरोबरच शिक्षकांनी सांस्कृतिक वैभववही जपावे, असे मत ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे आयोजित मानाचा समजला जाणारा शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा ऑनलाईन पद्धतीने नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अच्युत गोडबोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या अध्यक्ष मुग्धा लेले होत्या. सचिव विजय दिनानी, प्रफुल बरडिया उपस्थित होते. यावेळी गोडबोले ‘माझ्या लिखाणातील धमाल गमती जमती’ वर बोलताना त्यांच्या आर्यभट्ट, न्यूटन, आइन्स्टाइन, कॉम्प्युटर, अर्थशास्त्र, कायदे, शेक्सपिअर, तानसेन, प्रसिध्द चित्रकार वॅन गॉग, मायकल जॅक्सन इत्यादी विषयी चौफेर असलेल्या त्यांच्या सखोल ज्ञानाची प्रचिती उपस्थितांसमोर मांडली.
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील १२ शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते या पुरस्कारांचे झुमच्या माध्यमातून वितरण करण्यात आले. निवड समितीचे प्रमुख निलेश सोनजे यांच्या समितीने १२ विशेष शिक्षकांची पुरस्कार देण्यासाठी निवड केली.
यांचा झाला सन्मान
आदर्श शिक्षकांत माधुरी केवळराव पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-मोडाळे (इगतपुरी), सतीश इंगळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरठाण (सुरगाणा), पंकज दशपुते, जि. प. प्राथ. शाळा राजेवाडी (नाशिक), विश्वास राघो पाटोळे, जि. प. शाळा-ओझरखेड (दिंडोरी), प्रविण व्यवहारे, छत्रे न्यू इंग्लिश स्कुल, मनमाड, धनंजय राणे, उन्नती माध्यमिक विद्यालय, (नाशिक), गणेश कोठावदे, उन्नती माध्यमिक विद्यालय, (नाशिक), गिरीश कोठावदे, केबिएच विद्यालय (नाशिक), प्रविण खैरे, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय, (नाशिक), गणेश सुर्यवंशी, श्री. सिद्धिविनायक मानसिक दिव्यांग शाळा, (नाशिक), संगु गुरुजी, सौ.अदिती पानसे, कीर्ति कला मंदिर (नाशिक) या शिक्षकांना मानपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रम संयोजन प्रमुख हेमंत मराठे, निवड समिती प्रमुख निलेश सोनजे, मंथ लिडर सुचेता महादेवकर, ऋषीकेश सम्मनवार, जनसंपर्क संचालक संतोष साबळे, आदिती अग्रवाल, उर्मी दिनानी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले. यावेळी रोटरी क्लबतर्फ अच्युत गोडबोले यांना मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन अध्यक्षा मुग्धा लेले यांनी केले. कार्यक्रमाच सूत्रसंचालन स्मिता अपशंकर तर सचिव प्रफुल बरडीया यांनी आभार मानले.