सटाणा – स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणच्यावतीने कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. कोरोना काळात योगदान देणार्या शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांचा त्या त्या कार्यालयात जाऊन सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यात तहसिलदार जितेंद्र इंगळे, पोलिस निरीक्षक शिंदे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, एपीआय देवेंद्र शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बांगर, डॉ. कापडणीस, एस. टी. डेपो मॅनेजर उमेश बिरारी, बीडीओ कोल्हे, शिक्षण विभाग घोंघडे आदींचा सन्मान करण्यात आला. रोटरीचे अध्यक्ष योगेश आहिरे, रोटरॅक्टचे योगेश जाधव, कमलेश जाधव, सुजीत बिरारी, शुभम सोनवणे, सागर वाघ, हर्षवर्धन सोनवणे, उन्मेश नखाते यावेळी उपस्थित होते.