नाशिक : येथील रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी गंगापूररोडवरील शंकराचार्य न्याससंकुल पार्किंगमध्ये आयोजित करण्यात येतो. आज रविवार ( २४) रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत सेंद्रिय फळे, भाजीपाला आणि धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा सेंद्रिय भाजीपाला व धान्य शेतकरी समूहांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेला असून सर्व नाशिककरांसाठी खुला राहणार आहे. विशेष म्हणजे सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी उत्पादीत केलेल्या स्ट्रॉबेरीची चव चाखण्याची संधीही नाशिककरांना मिळणार आहे.
रोटरी क्लब ऑफ नाशिक वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो. रोटरी ऑरगॅनिक बाझार हा अन्नदाता ग्रामीण, अल्पभूधारक, गरजू शेतकऱ्यांसाठी आयोजित करीत असलेला नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांचा सेद्रिय पद्धतीने उत्पादित स्वच्छ, ताज्या भाज्या फळे सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली स्ट्राॅबेरी थेट कमीतकमी हाताळणी करुन ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय आदिवाशी व ग्रामीण शेतकरी माहिला, बचतगटांनी तयार केलेली घरगुती पध्दीतीची मसाले, सुकविलेल्या भाज्या, लाकडी, घाण्याचे तेले, हातसडी तांदूळ, सेंद्रिय गुळ ही उत्पादने देखील या बाजारात उपलब्ध होणार आहेत.
नाशिककरांना कोविड – १९ च्या परिस्थितीत आपले आरोग्य निरोगी ठेवण्याच्या दृष्टिने हा बाजार फलदायी ठरणार आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त नाशिककरांनी फायदा घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्षा मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, प्रफुल बरडिया, कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, जनसंपर्क संचालक संतोष साबळे आणि रोटरी बाजार समन्वयक रफिक व्होरा, तुषार उगले यांनी केले आहे.