नाशिक – नाशिककरांना स्वच्छ, ताजा आणि उच्च दर्जाची फळे, भाजीपाला योग्यआणि माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी क्लबने थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून भाजीपाला, फळे आणि धान्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी गेली तीन वर्षे पुढाकार घेतला आहे.विशेष म्हणजे या उपक्रमाला तमाम नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
येथील रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी गंगापूररोड व पहिल्या, तिसऱ्या रविवारी बीएसएनएल आवार कॅनडा कॉर्नर येथे आयोजित रोटरी ऑरगॅनिक बाजाराला नाशिककरांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. गंगापूररोड वरील शंकराचार्य न्याससंकुल पार्किंगमध्ये रविवार दि. १४ फेब्रुवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत बाजार आयोजित करण्यात आला आहे.
या ऑरगॅनिक बाजारचा लाभ जास्तीत जास्त नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबच्या अध्यक्षा मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, प्रफुल बरडिया, कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, जनसंपर्क संचालक संतोष साबळे, रोटरी बाजार समन्वयक रफिक व्होरा, तुषार उगले आदींनी केले आहे.