नाशिक – रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने नाशिककरांसाठी आयोजित केलेल्या ऑरगॅनिक भाजीपाला, फळे, रानभाज्या, कडधान्ये बाजारास नाशिककर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. स्वच्छ, ताजा भाजीपाला माफक दरात उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिककरांना शेतकऱ्यांचा ऑरगॅनिक पद्धतीने उत्पादित स्वच्छ, ताज्या पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या, फळे, कमीतकमी हाताळणी करून ग्राहकांना उपलब्ध देण्यात आला होता. जैविक घटकांचा वापर करून हानिकारक रसायन विरहीत उत्पादित व प्रमाणित केलेल्या मालास ग्राहकांनी चांगली पसंती दिली.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सुरक्षित अंतर आणि हात धुवूनच प्रवेश दिला. ग्रामीण भागातील शेतकरी महिला बचतगटांनी तयार केलेली घरगुती पद्धतीचे मसाले, सुकविलेल्या भाज्या, लाकडी घाण्याचे शेंग, खोबरे, बदाम, तीळ, मोहरी, करडई, सूर्यफुल खुरासणी, सूर्यफुल, एरंडतेले, हातसडी तांदूळ, सेंद्रिय गुळ या उत्पादनांनादेखील चांगली मागणी होती.
अवघ्या तीन तासात २५० हून अधिक नाशिककरांनी रोटरी बाजारला भेट देत खरेदी केली. सर्व भाजीपाला दर्जेदार व ऑरगॅनिक असल्यामुळे सर्व भाजीपाला विक्री झाली. ऑरगॅनिक फार्मिंगचे प्रणेते व शेतकरी बाजारची नाशिकमध्ये सुरुवात करणारे डॉ. मोराणकर यांनीही बाजाराला भेट दिली. शेतकरी व रोटरी सदस्यांशी सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.
भाजीपला स्वच्छ, ताजा आणि माफक दरात उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, प्रफुल बरडिया, कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, जनसंपर्क संचालक संतोष साबळे आणि रोटरी बाजार समन्वयक रफिक व्होरा, तुषार उगले, राज यादव, विनय देवधर तसेच सुधीर वाघ आदी प्रयत्नशील आहेत.
आरोग्यवर्धक रानभाज्यांना पसंती –
पेठ तालुक्यात आदिवासी शेतकऱ्यांनी आणलेल्या आरोग्यवर्धक रानभाज्या पहिल्या दीड तासात विक्री झाली. रानभाज्या व त्याची वैशिष्ट्ये व फायदे औषधी गुणधर्म ग्राहकांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. आदिवासी शेतकऱ्यांनी रोटरीच्या या उपक्रमात सहभाग दिल्याबद्दल आभार मानले. असून यापुढे नाशिककरांना जास्तीत जास्त रानभाज्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच परसबागेसाठी लागणारी भाजीपाला रोपे बियाणे खते खरेदीसही पसंती दिली