नाशिक : विद्यार्थ्यांत शालेय जीवनापासूनच नेतृत्व विकासाचे धडे मिळावेत, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवा, समाजाचे प्रश्न समजून त्यांच्यात सामाजिक भान जागृत व्हावे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अंतर्गत शालेय स्तरावर इंटरॅक्ट क्लबची निर्मिती करण्यात आली. या क्लबच्या वतीने १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान इंटरॅक्ट वीक सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. झूम प्लॅटफॉर्मद्वारे आठवडाभर चालणाऱ्या या सप्ताहात क्रीडा, कृषी, शिक्षण, आरोग्य, औद्योगिक, कला, साहित्य, सामाजिक अशा विविध माध्यमांतील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ नाशिक अंतर्गत इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधण्यावर भर दिला जातो. या उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी इंटरॅक्ट वीक सप्ताह घेण्यात येतो. दरम्यान कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सप्ताह झूम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होणार आहे. सात दिवस चालणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे – सोमवार १ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६ ते ७ या दरम्यान वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. हे उपक्रम झूम प्लॅटफॉर्मवर होणार आहेत जी सगळ्यांसाठी ओपन आहेत. क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणारे आयपीएल प्लेयर अभिषेक नायर आणि सावरपाडा एक्सप्रेस धावपटू कविता राऊत हे ‘खेळ आणि जीवन’ यावर संवाद साधणार आहेत. २ फेब्रुवारी रिंग प्लस लिमिटेड कंपनीस ‘इंडस्ट्रियल भेट’ आयोजित करण्यात आली आहे. ३ फेब्रुवारी रोजी प्रख्यात कार्टूनिस्ट ज्ञानेश सोनार हे संवाद साधणार आहेत. ४ फेब्रुवारी रोजी श्रीमती गौरी बापट या ‘मंडल आर्ट’ त्याचे फायदे आणि ते कसे बनवावे याबाबतीत मुलांना माहिती देणार आहेत.
५ फेब्रुवारी रोजी श्रेया पांडे ‘आयुष्याच्या वाटेवर पुढे जाताना’ या विषयावर बोलतील. ६ फेब्रुवारी रोजी वीन शैक्षणिक धोरणांविषयी’ संजय काळे आणि खुसरो इराणी हे मार्गदर्शन करतील. विशेष म्हणजे फ्रावशी इंटरनॅशनल अकादमी, विद्या प्रबोधिनी प्रशाला, फ्रावशी अकादमी, विज्डम हाय इंटरनॅशनल स्कूल इंटरॅक्ट क्लब, अनंत आणि टीनेज क्लब या शाळांच्या इंटरॅक्ट क्लबचे विद्यार्थी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणार आहेत. ७ फेब्रुवारी रोजी रेडीओ जॉकी भूषण मतकरी हे मुलांशी संवाद साधतील. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी मिटिंग आयडी ८८२६०७४४३६० असून पासवर्ड ४२१०२१ असा आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री इंटरॅक्ट वीक चेअर कमलाकर टाक, विनायक देवधर, सुचेता महादेवकर, उर्मिला देवधर, रीना मल्होत्रा, सुधीर जोशी, तृप्ती मेनन, माधवी सुकेणकर, मीनल काळोखे, लीना कुलकर्णी, कीर्ती टाक, सारिका पीच्चा, सविता पंडित आदी प्रयत्नशील आहेत. या कार्यशाळेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबच्या अध्यक्षा मुग्धा लेले, सेक्रेटरी विजय दिनानी, प्रफुल बरडिया, इंटरॅक्ट संचालक उर्मी दिनानी आणि अदिती अग्रवाल यांनी केले आहे.