नाशिक – आदिवासी विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांचा आदिवासी विकास भवनावर पायी मोर्चा काढत धडक दिली. त्यानंतर येथे एकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे रस्ताही जाम झाला आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तात हे आंदोलन सुरु आहे. रोजंदारीवरील वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. जूनपासून मानधन न मिळाल्याने तसेच आदिवासी विभागात समायोजन होत नसल्याने कर्मचारी संतप्त आहे.
मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा आंदोलक कर्मचाऱ्यांचा इशारा देतच हे आंदोलन सुरु केले. या आंदोलनत कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी केली.