नाशिकरोड – कोरोना रुग्णांची संख्या सर्वत्र वाढत असल्यामुळे रेल्वे स्टेशनवर तूरळक असणारी गर्दी आता वाढू लागली आहे. एरव्ही काही ठिकाणचे आरक्षण सहज व ऐनवेळी मिळत होते. ते मिळणेही अवघड झाल्याचे प्रवासी सांगत आहेत. गेल्या वेळेस रुग्णसंख्या वाढल्यानंतर दीर्घकाळ लॅाकडाउन करण्यात आला. त्यामुळे बाहेर राज्यातील काही प्रवाशी आतापासूनच काळजी घेत आहे. ज्यांना आता जाणे शक्य आहे. ते आपल्या गावी जात असल्याचे चित्र आहे. उत्तरेकडील ट्रेन्स त्यामुळे फुल्ल झाल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण असले तरी सरकारने कोरोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी कडक पाऊले उचलली आहे. त्यामुळे पहिल्यासारखी स्थिती आता नसेल. गेल्यावेळेस हे अचानक आलेले संकट होते. प्रशासनाची त्यादृष्टीने पूर्ण तयारी नव्हती. पण, आता सरकारची नव्या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण तयार आहे. त्यामुळे कोणी घाबरुण जाण्याचे कारण नाही. योग्य काळजी घेतल्यास या लाटेचा सामना करता येणार असल्याचे रेल्वेच्या एका अधिका-याने सांगितले.