मुंबई – रेल्वेतील प्रवास सुरु करण्यासाठी महाराष्ट्रातील आंतरजिल्हा नियम काढून टाकण्यात आला. त्यामुळे २ सप्टेंबरपासून आता महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात रेल्वेचे रिझर्वेशन करुन प्रवास करता येणार आहे. याअगोदर इतर ठिकाणचे बुकींग करता येत होते. पण, रेल्वेचे आंतर राज्य बुकींग करता येत नव्हते. पण, आंतरराज्य प्रवास करण्यासाठी परवाणगी दिल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे.