मुंबई – रेल्वेने प्रवास करायचा म्हणजे सर्वांत आधी रिझर्व्हेशनचे आणि विशेषतः ऑनलाईन बुकींगचे टेन्शन येते. मात्र आता हे टेन्शन दूर झाले आहे. एका मिनीटात वेबसाईटवरून दहा हजार प्रवासी तिकीट बुकींग करू शकणाऱ्या नव्या वेबसाईटचे लोकार्पण झाले आहे.
पूर्वी वेबसाईटवरुन एका मिनीटात ७ हजार ५०० प्रवासी तिकीट बुकींग करू शकत होते. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ची वेबसाईट आणि एप अपडेट झाल्यामुळे प्रवाश्यांना पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने तिकीट बुकींग करता येणार आहे. या वेबसाईट सोबत प्रवाश्यांचा जेवण व इतर खाण्याच्या सुविधाही जोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली.
या मिळणार सुविधा
आपल्या आवडीचे खाद्य पदार्थ आर्डर करण्याची सोय या सुविधेमुळे होणार आहे. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर एकाचवेळी क्राऊड वाढल्यास संकेतस्थळ हँग व्हायचे. तात्काळ व बुकींग सुरू होताच वेबसाईट स्लो व्हायची. त्यामुळे संकेतस्थळावरून बुकींग व्हायचे नाही. हीच समस्या सोडविण्यासाठी नवा मार्ग शोधण्यात आला आहे. त्यामुळे आनलाईन तिकीट बुकींग सोपे झाले आहे. दिशा चॅटबूटवरही विशेष सुविधा मिळणार असल्याचे कळते. यात ट्रेन कॅन्सलेशन, तिकीटांचे बुकींग, कॅटरिंगसह इतर अनेक प्रश्नांबाबत प्रवाश्यांना उत्तरे मिळू शकणार आहेत. आयआरसीटीसी एक नवे पोस्ट पेड पेमेंटचे आप्शनही वेबसाईटवर घेऊन आले आहे. तिकीट बुक केल्यानंतर पैसे नंतर देण्याची सोय यात असेल. आरक्षण व तात्काळ या दोन्ही सेवांसाठी ही सोय असणार आहे.