बंद यशस्वी करण्याचे आवाहन नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचे आवाहन
नांदगाव – नांदगाव शहर व ग्रामीण भागावर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गेट बंद करुन जवळपास सर्व रेल्वेचे थांबे रद्द करुन रेल्वे प्रशासना अन्याय करत असल्यामुळे या अन्यायाविरोधात सोमवारी आम्ही नांदगावतर्फे नांदगाव बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी केले. दरम्यान सोमवारच्या बंद शंभर टक्के होण्याच्या दृष्टीने संघटित झालेल्या कृती समितीच्या वतीने आज व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेत बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात आली. सकाळी संतोष गुप्ता, सुमित सोनवणे, तुषार पांडे, हनीफ शेख, सुनील जाधव, विजय चोपडा, डॉ. सुरेश गायकवाड रवी सानप, वाल्मिक जगताप, विलास कोतकर, सुमित गुप्ता, आदींच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे यांची भेट घेऊन सोमवारच्या नियोजित नांदगाव बंद व मागण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा करून त्यांना निवेदन दिले. सोमवारी व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे यासाठी दुकानदारांच्याही कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भेटी घेत त्यांना बंद मागील भूमिका समजावून सांगितली. दरम्यान रेल्वे फाटक बंद करणाऱ्या रेल्वे प्रशासन करत असल्यामुळे नांदगावकर अधिक संतप्त झाले आहे.
रेल्वे प्रशासनाने फाटकावर खड्डे खोदण्याचे काम सुरु केले.