नांदगाव – नांदगाव रेल्वे स्टेशनवरील अनेक गाड्यांचे थांबे रद्द करणे व पूर्वसूचना न देता रेल्वे गेट बंद करून नांदगाव करांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नांदगाव कृती समितीतर्फे नांदगाव बंद करण्यात येऊन मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार सुहास आण्णा कांदे, संतोष गुप्ता, डॉ तुसे, सुमित सोनवणे, सुनिल जाधव, सुमित गुप्ता, चंद्रशेखर कवडे, सुरेश दंडगव्हाळ, संजय मोकळ, आदींसह नांदगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासून रेल्वे प्रशासनाच्या धोरणामुळे नांदगावकरांमध्ये प्रचंड असंतोष आहे.