नाशिक -मनमाडहून – मुंबई पर्यंत १२ सप्टेंबरपासून स्पेशल ट्रेन सुरु होणार आहे. त्यासाठी रेल्वे काही सुचना केल्या आहे. त्या पुढीलप्रमाणे आहे.
COVID-19 दरम्यान विशेष गाड्यांमध्ये प्रवासासाठी मार्गदर्शक सूचनाः
– स्पेशल ट्रेन क्र. 02110/02109 (मनमाड-मुंबई-मनमाड) 12 सप्टेंबर 2020 पासून सुरु होणार.10 सप्टेंबर 2020 पासून तिकिटांचे आरक्षण सुरू होईल.
- केवळ आरक्षित प्रवाशांना स्टेशन आवारात प्रवेश आणि प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.
– - कोणतेही अनारक्षित तिकीट दिले जाणार नाही.
– - या गाड्या पूर्णपणे राखीव ठेवल्या जातील. केवळ वैध / कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल
– - प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
– - थर्मल स्क्रिनिंगसाठी प्रवाशांनी स्टेशनवर किमान 90 मिनिट अगोदर येणे आवश्यक आहे.
– - COVID-19ची कोणतीही लक्षणे नसलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.
– - प्रवाशांनी स्टेशन परिसरात व प्रवासादरम्यान फेस मास्क परिधान करणे अनिवार्य आहे.
– - प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी COVID-19शी संबंधित सर्व निकष, एसओपीचे पालन करावेवेळापत्रक
- विविध स्थानकांवर गाड़ी क्र 02110/02109 आगमन / प्रस्थान वेळ (मनमाड-मुंबई-मनमाडविशेष):
प्रस्थान – मनमाड से 06:02 वा , लासलगाँव -06:18/06:20 , निफाड-06:28/06:30 , नाशिक रोड -07:07/07:10 , देवळाली – 07:16 /07:18 , कल्याण – 09.38/09:40 , दादर- 10:25 - डाउन दिशा – दादर -18:28/18:30, कल्याण –19:10/19:13, देवलाली – 21:23 /21:25, नाशिक रोड – 21:32/21:35, निफाड- 22:00/22:02 , लासलगाँव – 22:15 /22:17, मनमाड आगमन 22:50