मुंबई – पळत जाऊन चालत्या ट्रेनमध्ये चढणे खूप धोकादायक असू शकते, त्यामुळे अनेकदा अपघातांमध्ये लोक आपला जीव गमावतात. मुंबई नजिकच्या कल्याण रेल्वे स्थानकात चालत्या रेल्वेत चढताना एका प्रवाशाचा पाय सटकला अन् त्या अपघातात मृत्यू झाला. त्याचा मृतदेहाला आरपीएफच्या दोन जवानांनी रुळावरून बाहेर काढले. ही दुर्घटना रेल्वे स्टेशनवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
या संबंधीच्या व्हिडीओमध्ये असे दिसते आहे की, एक प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो, परंतु या दरम्यान त्याचा पाय घसरला. तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेन दरम्यान अडकला, त्यात तो मरण पावला होता. पण त्याचवेळी तेथे उपस्थित रेल्वे संरक्षण दलाच्या दोन कर्मचाऱ्यांनी धावत जाऊन त्याला खेचून बाहेर काढले.
https://twitter.com/ANI/status/1355519841927458818