नाशिक – जिल्ह्यातील कांदा हा बांगलादेशात पाठविण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक वेळेत मध्य रेल्वेने कसबे सुकेणे येथे गुड्स शेड परिसंचारी क्षेत्र सुरू केले आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागा मधील व्यवसाय विकास युनिट ला आणखी एक यश प्राप्त झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कसबे सुकेणे येथे गुड्स शेडचा विकास परिसंचारी क्षेत्र सहित आठवड्याभरात युद्धपातळीवर करण्यात आले. ४२ वॅगनचा पहिला रॅक शुक्रवारी (२८ ऑगस्ट) रोजी कसबे सुकेणे स्थानका वरून बांग्लादेश दर्शना या स्थानका साठी रवाना करण्यात आला. कसबे सुकेणे येथे नवीन गुड्स शेड बनल्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना त्यांचे उत्पादन भारतात विक्री करण्यात मदत होईल व निर्यातही करता येईल. मध्य रेल्वेने आतापर्यंत बांग्लादेशसाठी कांद्याचे ७१ रॅक रवाना करण्यात आले आहेत.