मुंबई – रेल्वेने मुंबई व हावडा दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित विशेष अतिजलद दुरांतो गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाड्या पुढील प्रमाणे आहे.
02095 दुरांतो विशेष दि. १३.६.२०२१ पासून ३०.६.२०२१ पर्यंत दर मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १७.१५ वाजता सुटेल आणि हावडा येथे दुसर्या दिवशी २०.०५ वाजता पोहोचेल.
02096 दुरांतो विशेष दि. ११.६.२०२१ पासून २९.६.२०२१ पर्यंत दर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी हावडा येथून ०५.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसर्या दिवशी ०८.१५ वाजता पोहोचेल.
थांबे : भुसावळ, नागपूर, रायपूर, बिलासपूर आणि टाटानगर.
संरचना : १ प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १२ तृतीय वातानुकूलित व एक पेंट्री कार.
मुंबई -पाटणा विशेष सेवा पूर्ववत
ट्रेन क्रमांक 03260 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पाटणा द्वि-साप्ताहिक विशेष दि. १५.६.२०२१ पासून २.७.२०२१ पर्यंत दर शुक्रवार आणि मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.
ट्रेन क्रमांक 03259 पाटणा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष दि. १३.६.२०२१ पासून ३०.६.२०२१ पर्यंत दर बुधवार आणि रविवारी पटना येथून सुटेल.