भुसावल – कोरोना साथीच्या काळातही रेल्वे प्रशासन सावधगिरीने आपले काम करीत आहे, या गंभीर साथीच्या काळातही मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून बिना तिकिटे प्रवास करणारे ,अनियमित तिकीट यात्रा , ज्येष्ठ नागरिक सवलतीचा गैरवापर हे रोखण्यासाठी अनियमित यात्रा करणारे साठी विशेष तिकीट तपासणी मोहीम ही दिनांक २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
या विशेष तिकीट तपासणी मोहीमेत एकूण १७३ अनियमित प्रवाशांना दंड आकारण्यात आल आहे. १८ तिकीट तपासणी कर्मचारी आणि ४ आरपीएफ कर्मचारी यांनी प्रवाशांकडून एकूण ९३ हजार ५३० रुपये रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. या मध्ये जे दंड भरण्यात असमर्थ होते त्यांच्यावर धारा १३८ नुसार २ गुन्हे दाखल करण्यात आले. १३७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईनंतर मध्य रेल्वे भुसावळ मंडळाने आवाहन केले की, प्रवाशांनी योग्य तिकिटासह प्रवास करावा.
भुसावळचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व मंडल वाणिज्य प्रबंधक बी. अरुण कुमार , सहाय्यक वाणिज्य प्रबंधक(टी जा), मंडल मुख्य तिकीट निरीक्षक आहुलवलीया आणि विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय डी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी ही विशेष तिकीट तपासणी मोहीम करण्यात आली.