नवी दिल्ली – रेल्वे मध्ये मेगा भरती होणार आहे.रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी त्यासंदर्भातील घोषणा केली आहे. १ लाख ४० हजार ६४० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यातील परीक्षा १५ डिसेंबरला होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
रेल्वे मंत्रालायने विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी १५ डिसेंबर २०२० रोजी परीक्षा होणार असल्याचे त्यांनी ट्विटरवरुन जाहीर केले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करुन परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
मेगाभरतीसाठी यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. यात २.४० कोटी अर्ज प्राप्त झाले असून परीक्षेसाठी त्याच्या छाननीचे काम सूर असल्याचे त्यांनी संगीतले. कोरोनामुळे रेल्वे मंत्रालयाला उमेदवारांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट लांबणीवर टाकावी लागली होती. ३५ हजार २०८ जागा बिगर तांत्रिक गट (गार्ड, लिपिक, क्लर्क), १ हजार ६६३ जागा मंत्रालयीन स्तर अर्थात स्टेनो आणि १ लाख ३ हजार ७६९ जागा ट्रॅकमन, पॉईंटमनसाठी असणार आहे. परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी नाराज झाले होते. परंतु, येत्या डिसेंबरमध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यानिर्णयामुळे सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.