नाशिक -घोटी ते मनमाड रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वेच्या ८७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या मनमाड, निफाड, देवळाली कॅम्प, नाशिक रोड, लहवित, घोटी रेल्वे स्टेशन वर विशेष करून कोरोनाची लागण झाली आहे. त्यात नाशिक रोडचे कर्मचारीही जास्त असल्याचे बोलले जाते.
.
नाशिकरोड येथील रेल्वे स्टेशन मास्तर आर. के. कुठार यांनी सांगितले की नाशिक रोड रेल्वे स्थानकामध्ये १६ ते १८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून ते घरी उपचार घेत आहे. अनेक लोक सरकारी दवाखान्यात उपचार घेत असून अनेक लोकांनी गृह विलगीकरण पसंत केले आहे. विशेष करून कमर्शिअल क्षेत्रात काम करणारे रेल्वेचे कर्मचारी यांना कोरोणाची लागण झाली आहे. इंजीनियरिंग ऑपरेटिंग काउंटरवर काम करणारे खाद्यपदार्थ सेवा तिकीट सेवा फ्रन्टलाइन वर्कर यांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे. म्हणून घोटी ते इगतपुरी दरम्यान जवळपास ८७ कर्मचारी कोरोना त्यांच्यावर उपचार सुरू आहे.