भुसावळ – रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावल रेल्वे विभागातूून २९ जानेवारी रोजी ३८ रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मच्या-यांना रेल्वे तर्फे तात्काळ १० कोटी ५ लाख ७५ हजार ६५० रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा व्हर्च्युअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्यांचा यथोचित सन्मान व्हर्च्युअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमा द्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधी म्हणून खंडवा, अकोला, भुसावल, पाचोरा, चालीसगांव, बड़नेरा, अमरावती, इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पीपीओ फोंल्डर दिलेत. सेवानिवृत्ती बद्दल कर्मचा-यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्ती बद्दल शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात कार्मिक अधिकारी विरेन्द्र वडनेरे यांनी आभार मानले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.