नवी दिल्ली – रेल्वेचं खाजगीकरण केलं जाणार नाही, याचा पुनरुच्चार केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत केला. भारतीय रेल्वे हि राष्ट्राची संपत्ती असून ती कायम तशीच राहील, असं ते म्हणाले. खासगी क्षेत्राला रेल्वेमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर राष्ट्राच्या हितासाठी त्यांचं स्वागत असेल, खाजगी क्षेत्रामुळे रेल्वेची वाटचाल अधिक गतिमान आणि प्रभावी होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.
देशात १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकंदर ३८६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित झाली आहेत, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योगमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत दिली.
देशात सुमारे ३६ कोटी ७१ लाख एल इ डी दिव्यांचं माफक दरात वितरण करण्यात आलं असून त्यामुळे कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात घाट होणं अपेक्षित आहे, असं ही त्यांनी सांगितलं. दरम्यान काँग्रेस पक्षाला लोकशाहीबाबत बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी केली.
काँग्रेसच्या कार्यकाळात, जयप्रकाश नारायण, अटळ बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांना नाहक तुरुंगवास भोगावा लागला, असं रेड्डी म्हणाले.