नाशिक – रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वितरणासाठी नवीन कार्यपद्धती आज पासून लागू करण्यात येत आहे. या व्यवस्थेद्वारे गरजू व्यक्तीपर्यंत उपलब्धतेच्या प्रमाणात अत्यंत पारदर्शकरीत्या Remdisivir पोहोचवणे शक्य होईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष सुद्धा स्थापन करण्यात आलेला आहे. या सर्व प्रक्रियेवर त्याचे थेट नियंत्रण राहिल अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.