नवी दिल्ली – कोविड रुग्णांवरील उपचारासााठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारने मंजुरी दिली आहे. रेमेडिसिवीरच्या दर महिन्याला ३९ लाख वायल्सचं उत्पादन होत होते. ते आता महिन्याला ७८ लाख वायल्स तयार केल्या जाणार आहेत. अगोदर या रेमेडिसीवीरचे उत्पादन ७ कंपन्या करत होत्या. आता आणखी सात ठिकाणी हे औषध तयार केले जाणार आहे.
केंद्रीय रसायनं आणि खतं मंत्री मनसुख मांडविय यांनी गेले दोन दिवस रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर रेमडेसिवीरचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखावी, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. गेले काही दिवस रेमडेसिवीरचा सर्वत्र तुटवडा झाल्यामुळे अनेक ठिकाणी तक्रारी होत्या. राज्यातही या औषधासाठी राज्य सरकारने कठोर पाऊले उचलली आहे.