नाशिक – कोरोना विषाणूवर उपचारार्थ आवश्यक असणारे रेमडिसिव्हिर हे इंजेक्शन आता अवघ्या ८९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. तशी माहिती नाशिक जिल्हा केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी गोरख चौधरी यांनी दिली आहे. हे इंजेक्शन हजारो रुपयांना यापूर्वी विकले जात होते. काही दिवसांपूर्वीच एका कंपनीचे हे इंजेक्शन १२९९ रुपयांना मिळत आहे. आणि आता हे इंजेक्शन थेट ८९९ रुपयात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच इंजेक्शनची किंमत अवाक्यात आल्याने अनेक रुग्णांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
हे इंजेक्न हवे असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा
६६६२७७७ किंवा ९५४५७७४५४५ किंवा ७२६२९९९२२२
आवश्यक कागदपत्रे
रुग्णाचा कोरोना आहवाल
डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन
आधार कार्ड