गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रेमडिसिव्हरचा साठा शासकीय रुग्णालयाच्या औषध विक्री केंद्रामार्फत उपलब्ध करुन द्यावा – भुजबळ

by India Darpan
सप्टेंबर 25, 2020 | 11:31 am
in संमिश्र वार्ता
0
WhatsApp Image 2020 09 25 at 3.12.53 PM

 

नाशिक – जिल्ह्यात उपलब्ध असलेली रेमडिसिव्हरची इंजेक्शन रूग्णांना वेळेत व वाजवी दराने मिळतील याची दक्षता घ्यावी. रेमडिसिव्हरचा पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच त्याचा किती  साठा उपलब्ध आहे याबाबत प्रत्येक रुग्णालयाबाहेर बोर्ड लावण्यात यावा. जास्तीत जास्त रेमडिसिव्हरचा साठा शासकीय रुग्णालयाच्या औषध विक्री केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्याच्या सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्याची आढावा बैठक राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.  जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहिरे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सिमांतीनी कोकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री  भुजबळ म्हणाले, रुग्णसंख्या मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घट होत असली तरीदेखील भविष्यातील संभाव्य वाढ विचारात घेता ऑक्सिजन, बेड्स आणि औषधांची कमतरता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

 

 गर्दीच्या ठिकाणी मार्केटच्या ठिकाणी जनजागृती व प्रसिद्धीवर भर देण्यात यावा

कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत शासन-प्रशासनास स्वस्थ बसता येणार नाही. मुंबईतील केईएमच्या धर्तीवर नाशिक मध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी अद्यावत महापलिकेमार्फत रुग्णालय तयार करण्यास प्राधान्य देण्यात यावे. ऑक्सिजन टॅन्क लवकरात लवकर बसविण्यात यावेत. तसेच याबाबत काय कामे झाली याची पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात येईल असेही यावेळी पालकमंत्री  भुजबळ यांनी सांगितले.

 

नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी मृत्युदर

शहर जिल्ह्यातील मृत्युदर आटोक्यात राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. येवला उपजिल्हा रुग्णालयात तातडीने सर्व सुविधा व व्यवस्था पूर्ण करण्यात याव्यात असे सांगून पालकमंत्री भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात ६८८२९ कोरोनाग्रस्त त्यातील ८८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. १०८१८ वरून ३ हजाराने जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली आहे. देशात आणि राज्यातील मृत्यूदरा पैकी नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी मृत्युदर आहे. शून्य मृत्युदर करण्यासाठी प्रशासन काम करत आहेत.

 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे. ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत देखील प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसात प्रयत्नपूर्वक नवीन क्षमता निर्माण केली आहे व सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत नाही. सर्वसामान्य नागरिकांना सहजतेने माहिती उपलब्ध होण्यासाठी औषध उपलब्धते बाबत प्रचार प्रसार करण्यास प्राधान्य देण्यात यावे. प्रत्येक रुग्णालयाबाहेर बेड्स आणि औषध साठ्याबाबत  बोर्ड लावण्यात यावेत व यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी. तसेच मेडिक्लेमच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी  राज्यस्तरावर नेण्यात येऊन सोडविण्यात येतील, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सरोज आहेर आदींनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील एकंदरीत व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.  महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील माहिती सादर केली.

00000

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पिंपळगाव बसवंत – जोरदार पावसाने दोन एकर मका जमीनदोस्त

Next Post

पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे अध्यक्ष रामदास महाराज यांचे निधन

India Darpan

Next Post
IMG 20200925 WA0039 e1601035489211

पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे अध्यक्ष रामदास महाराज यांचे निधन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011