रेनॉल्ट क्विड
क्विडची किंमत ३ लाखांपासून सुरू होते. या कारवर कंपनीकडून ४०,००० रुपयांची सूट देण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्यात ग्राहक या सवलतीचा फायदा घेऊ शकतात. या ऑफरमध्ये ग्राहकांना ९,००० रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट सूट देण्यात येणार असून ग्रामीण ग्राहकांना खास ऑफर देण्यात येणार आहे. तसेच या ऑफरमध्ये ग्राहकांना ३.९९ टक्के व्याजदर देखील देण्यात येणार आहे.
रेनॉल्ट ट्रायबर
या कारची किंमत भारतात ५.१२ लाख रुपयांपासून सुरू होते. ट्रायबरवर ३०,००० रुपयांची सूट देण्यात येत आहे. यात ग्राहकांना ९,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळणार असून ग्रामीण ग्राहकांना विशेष ऑफर दिल्या जातील. याशिवाय ग्राहकांना ३.९९ टक्के विशेष व्याजदरही देण्यात येणार आहे.
कारची किंमत ८.५९ लाख रुपये आहे. यात ३०,००० रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट सवलत आणि ग्रामीण ग्राहकांना विशेष ऑफरसह १.५ लिटरवर ७०,००० रुपयांची सूट देत दिली जात आहे. त्याचबरोबर १.३ लिटर टर्बोमध्ये २०,००० रुपयांची सवलत दिली जात आहे.