नवी दिल्ली – रशियाने बनविलेल्या कोरोना लसीची निर्मिती भारतात रेड्डीज लॅब करणार आहे. यासाठी डॉ. रेड्डीज लॅब आणि आरडीआयएफ या दोन्ही संस्थांमध्ये करार झाला आहे. या करारानुसार रशियन कंपनी आरडीआयएफ ही भारताला १० कोटी डोसचा पुरवठा करणार आहे. ही लस भारतात नोव्हेंबरपासून उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, आणखी भारतीय चार फार्मा कंपन्यांसोबत बोलणी सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सीरमला पुन्हा परवानगी
नवी दिल्ली – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या चाचणीची पुन्हा परवानगी देण्यात आली आहे. सीरमने ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत अॅस्ट्रोझेनेकासह कोरोना लस विकसित करीत आहे. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये ही लस दिलेल्या व्यक्तीची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिच्या चाचण्या थांबविण्यात आल्या होत्या. लंडनमध्ये चाचणी पुन्हा सुरू झाल्याने भारतानेही सीरमला चाचणीची परवानगी दिली आहे.