नाशिक – राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत देऊन दिलासा दिला असला तरी रेडिरेकनरचे दर मात्र वाढविले आहेत. नाशिकध्ये दीड ते दोन टक्क्यांच्या दरम्यान रेडिरेकनरचे दर वाढले आहेत. हे दर १२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. तसे, महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
—
नाशिकमध्ये रेडीरेकनर ०.७४ टक्के एवढे अल्प वाढले आहेत. काही तांत्रिक कारणाने ते वाढलेले दिसतात. यामुळे नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रावर काहीही विपरीत परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा आहे.
– सुनील गवादे, पदाधिकारी, नरेडको, नाशिक
—
कुठल्या क्षेत्रात किती वाढ झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्षेत्रनिहाय दरवाढीचा तक्ता आल्यानंतरच अधिक सांगता येईल. मात्र, दरवाढ फारशी नसल्याचे समजते.
– रवी महाजन, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक
—
रेडिरेकनर दरवाढ अल्पच आहे. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम होईल, असे दिसत नाही. यापूर्वीच सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करुन सर्वसामान्यांचे गृहस्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी दिली आहे.
– जयेश ठक्कर, पदाधिकारी, नरेडको, नाशिक
—
जागांचे सरकारी मूल्य (रेडिरेकनर) कुठे किती वाढले ? तक्ता पुढीलप्रमाणे