मुंबई – राज्यात आतापर्यंत एकूण ६ लाख ३६ हजार ५७४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.१ टक्के आहे. आज १० हजार ८०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख २० हजार ६६१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४५ लाख ५६ हजार ७०७ नमुन्यांपैकी ८ लाख ८३ हजार ८६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ८१ हजार ९०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार १९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शनिवारी (५ सप्टेंबर) ३१२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.९७ टक्के एवढा आहे.