नाशिक – रुग्णाने मास्क न वापरल्याने डॉक्टरावर कारवाई करीत तब्बल ५ हजाराचा दंड करण्यात आला आहे. याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने तीव्र निषेध केला आहे. नाशिक आयएमएचे अध्यक्ष समीर चंद्रात्रे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की,
दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये सांगून देखील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकानी मास्क घातला नाही म्हणून त्या डॉक्टर वर कारवाई करणे ही हसण्याजोगी गोष्ट आहे .गेल्या वर्षीपासून पंतप्रधानांपासून ते महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत अधिकारी, मास्क वापरण्याचं सांगत असून देखील , मास्क न वापरणारे महाभाग मुंबई दिल्ली येथे लोकल मध्ये ,रेल्वे मध्ये ,रस्त्यांवर दिसत आहेत मग ह्यासाठी कुणाला दंड करावा???
ही बेफिकिरी समाजामध्ये दिसत आहे आणि त्यासाठी डॉक्टर जबाबदार नाही आणि प्रशासन देखील नाही. समाजात जागृतता आहे पण जबाबदारी घेण्याची कुवत नाही. कदाचित त्यामुळेच मुख्यमंत्री महोदयांनी मी जबाबदार ही हाक दिली असावी.
परंतु अश्या हाकेला ओ देणारी समजदार पिढी कुठे हरवली आहे कोण जाणे.
आयएमएचे अध्यक्ष म्हणून मी शासनाला आवाहन करतो की डॉक्टरांवर अश्या कारवाई करून चुकीचा पायंडा पडू नये. ही कारवाई तत्काळ थांबवावी. आणि मास्क न घालणाऱ्या बेफिकीर व्यक्तीवरच व्यक्तिगत कारवाई करावी…
ज्या डॉक्टर मंडळींनी *मास्क मस्ट campaign* केले ,समाजाला मास्क वापरण्याचा मार्ग दाखवला त्या डॉक्टरवर रुग्णांनी मास्क लावला नाही म्हणून ५ हजार रुपये दंड केला जातो ह्या मागे नक्की काय गौडबंगाल आहे हा विचार समाजानं करावा अशी वेळ आली आहे .
.. लोकशाही मूल्यांना धरून डॉक्टरना लोकांच्या बेजबाबदार वर्तनासाठी वेठीस धरणे हे योग्य नव्हे, असे चंद्रात्रे यांनी पत्रकात म्हटले आहे.