नवी दिल्ली – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने सलग तिसऱ्या दिवशी रविवारी (३० ऑगस्ट) अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी केली. या चौकशीत अंमली पदार्थ पुरवण्यासंदर्भात गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्य याचे नाव पुढे आले होते. त्याची चौकशी सक्त वसुली संचालनालय (ईडी) तसेच अंमली पदार्थ नियंत्रण कार्यालयातर्फे करण्यात येणार आहे.
दानवे यांचा आरोप
दरम्यान, सुशांतसिंह प्रकरणात भाजपाचा कसलाही संबंध नाही. कुणाला तरी वाचवण्यासाठी सीबीआय चौकशीला विरोध करणारे आता या प्रकरणावरुन निष्कारण भाजपाचे नाव गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.