मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशी दरम्यान पुढे आलेल्या ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर रियाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) कडे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच सुटकेनंतर नियमित दहा दिवस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावणे रियाला अनिवार्य करण्यात आले आहे. कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, रियाला जामीन मिळाला असला तरी तिच्या भावाचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. तसेच शौविक चक्रवर्ती, अब्दुल बासित परिहार यांचाही अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. रियासह मिरांडा आणि दीपेश सावंतचा जामीन देखील मंजूर झाला आहे. न्यायधीश सारंग वी. कोतवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत आपला निर्णय सुनावला आहे.