मुंबई – अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला तब्बल तीन महिन्यांनी जामीन मिळाला आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने हा ५० हजारांचा सशर्त जामीन शौविकला मंजूर केला आहे. रियासह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या ७ ऑक्टोबर रोजीच जामीन मंजूर केला होता. मात्र, शौविकसह अन्य काही जणांचे जामीन अर्ज नाकारले होते. मुंबई बाहेर जाताना शौविकला पोलिसांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तपासासाठी हजार रहावे. पुढील सहा महिन्यापर्यंत ही हजेरी शौविकला द्यावी लागणार आहे, तसे आदेश कोर्टाने दिले आहेत.