नाशिक – नातेवाईकांकडून पैसे घेतल्यानंतर रिक्षात बसून घराकडे जाणाऱ्या वृद्धाच्या खिशातील २० हजार २०० रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबवली व वृद्धास अर्ध्या रस्त्यात उतरवून दिले. याप्रकरणी भिमराव सखाराम जाधव (वय ६३, रा. जयहिंद कॉलनी, अंबड) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भिमराव जाधव हे रविवार (दि. २०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार येथून रिक्षात बसून अंबडकडे चालले होते. रिक्षाचालकाने जाधव यांना पाठिमागे आगोदरच बसलेल्या दोन प्रवाशांच्या मध्यभागी बसवले. यावेळी बाजूला बसलेल्या दोन्ही प्रवाशांनी जाधव यांच्यासोबत हुज्जत घातली. उंटवाडी येथील विशाल पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकण्यासाठी रिक्षा थांबवण्यात आली असता हुज्ज त घालत असल्याचे कारण देत भाडे न घेता रिक्षाचालकांना जाधव यांना खाली उतरवून दिले. खाली उतरल्यानं तर जाधव यांनी खिशे तपासले असता त्यांच्या पॅन्टच्या खिशातील २० हजार तर शर्टच्या खिशातील २०० रुपये रिक्षातील त्या प्रवाशांनी काढून घेतल्याचे लक्षात आले. याप्रकरणी हवालदार सातभाई तपास करत आहे.
जॉगिंगसाठी निघालेल्या वृद्धाला धडक
नाशिक – सकाळी जॉगिंगसाठी बाहेर पडलेल्या वृद्धास अज्ञात मोटारसायकलने धडक दिली. यात शशिकांत ढिकले (वय ७०, रा. पंपिंग स्टेशन, गंगापुररोड) हे जखमी झाले आहे. याप्रकरणी शशिकांत यांचा मुलगा सुहास ढिकले यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
१६ डिसेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास शशिकांत ढिकले हे दत्त चौक, सुयोजित गार्डन परिसरात फिरत होते. यावेळी अज्ञात मोटारसायकलस्वाराने त्यांना पाठिमागून धडक दिली. त्यात त्यांचे डोके, डोळे व क पाळास दुखापत झाली आहे. याप्रकरणी हवालदार कटारे तपास करत आहे.
कारमध्ये बसणाऱ्या महिलेची चेनस्नॅचिंग
नाशिक – कारचा दरवाजा उघडून आतमध्ये बसण्याच्या तयारी असलेल्या महिलेच्या गळ्यातील ९५ हजार रुपये किमतीची सोन्याची पट्टीपोत अज्ञात मोटारसायकलस्वारांनी हिसकावून नेली. याप्रकरणी योगिता युवराज अहिरराव (रा. आशापुरा सोसायटी जवळ, पंचवटी) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २०) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी योगिता या कुटूबियांसोबत ज्वलर्स दुकानाच्या उद्घाटनासाठी राधानगर, मखमलाबाद रोड परिसरात आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या कारमध्ये बसण्याच्या तयारी असताना मागीमागून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी योगिता यांच्या गळ्यातील ३४ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हिसकावून पळ काढला. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक एस. बी. चोपडे तपास करत आहे.