नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेदरम्यान राहुल गांधी मोदी सरकारविरोधात हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यांबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती. यादरम्यान त्यांनी विरोधी पक्षावरही टीका केली होती.
पंतप्रधानांवर आरोप
पंतप्रधानांच्या विकास मॉडेलमधून सार्वजनिक क्षेत्रांची संख्या कमी झाल्याने देशाचे नुकसान होणार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मंगळवारी केली होती. मोदी यांच्या विकासात सार्वजनिक उपक्रमातील आकडे एक वरून दहावर पोहोचले आहे ज्यामुळे देशाचे मोठे नुकसान होणार असून केवळ त्यांच्या जवळच्या लोकांचं भलं होणार आहे, असं राहुल गांधी यांनी ट्विटवर म्हटलं होतं.