नाशिकरोड – नुकताच दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने ऑनलाईन पार पडलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सव २०२०-२१ अंतर्गत आयोजित हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत स्पर्धेत नाशिकरोड येथील रहिवासी असलेला व केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान शाखेत बारावीस असलेल्या अथर्व ओंकार वैरागकर याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
ज्येष्ठ गायक पंडित शंकरराव वैरागकर यांचा हा नातू असून वैरागर घराण्यातील चौथ्या पिढीनेही आता संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. बालपणापासून घरातच मिळालेले संगीताचे बाळकडू यामुळे आपण या स्पर्धेत जिल्हा, विभाग, राज्य स्थरावर यश गाठत राष्ट्रीय पातळीवर यश मिळवल्याचे अथर्वने सांगितले. या स्पर्धेत भारतातील ३७ राज्यातील प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता. सदर कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांसह राष्ट्रीय क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. त्याच्या या यशाने महाविद्यालयासह नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अथर्वच्या यशाबद्दल पंडित शंकरराव वैरागकर, मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार,प्राचार्य व्ही.बी.गायकवाड, उपप्राचार्य अशोक भालेराव यांसह नातेवाईक व कुटुंबीयांनी शुभेच्छा दिल्या आहे.