सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटाचा डंका, बार्डो, आनंदी गोपाळ चित्रपटाला पुरस्कार

by India Darpan
मार्च 22, 2021 | 2:17 pm
in संमिश्र वार्ता
0
11111

नवी दिल्ली – ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील चित्रपटांमध्ये ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘ताजमाल’ या मराठी चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आज ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये विविध श्रेणीत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.
‘बार्डो’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला  आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे आहेत. हा चित्रपटाचे निर्माते रितु फिल्मस् कट एलएलपी आहेत. याच चित्रपटातील ‘रान पेटला…’ या गाण्याच्या गायिका सावनी रविंद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Anandi Gopal
‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच या सिनेमाला उत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनचाही पुरस्कार जाहीर झाला आहे.  प्रोडक्शन डिझाइन  सुनिल निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केले आहे.
राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ‘ताजमाल’ या सिनेमाला जाहीर झाला आहे.  हा सिनेमा नियाज मुजावर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर टूलाईन स्टुडिओ प्रा.लि. यांची निर्मिती आहे.
‘ताकश्ंत फाईल’ या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.  उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार ‘कस्तुरी’ या हिंदी सिनेमाला जाहीर झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक विनोद कांबळे आहेत तर इनसाईट फिल्मसची निर्मिती आहे.
नॉन फिचर फिल्म या श्रेणीत विविध मराठी चित्रपटांना पुरस्कार
‘जक्कल’ या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म या श्रेणीत उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सिनेमा निऑन रील क्रिएशनने निर्मित केला असून विवेक वाघ दिग्दर्शक आहेत.
उत्कृष्ट डेब्यु दिग्दर्शक या श्रेणीमध्ये ‘खिसा’ या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते पीपी सिने प्रोडक्शन आहेत. तर राज प्रितम मोरे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहे.
सामाजिक विषयावर आधारित श्रेणीत  ‘होली राईट्स’ या हिंदी नॉन फिचर फिल्मला विभागुन पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्मात्या प्रियंका मोरे या आहेत तर दिग्दर्शक फराह खातून या आहेत.
स्पेशल मेन्शन या श्रेणीत २ मराठी चित्रपटांना पुरस्कार जाहीर
स्पेशल मेन्शन या श्रेणीत ‘लता भगवान करे’ या मराठी सिनेमाच्या अभिनेत्री लता करे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याच श्रेणीत ‘पिकासो’ या सिनेमाला सुद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत वारंग हे आहेत.
सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रटाचा पुरस्कार ‘अनु रूवड’ या सिनेमाला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते  ओबो नोरी पिक्चर आहेत तर दिग्दर्शक दिलीप कुमार डोले हे आहेत.
‘त्रिज्या’ या सिनेमाला  उत्कृष्ट ऑडिओग्राफी (साऊंड डिजाइनर) चा पुरस्कार जाहीर झाला आहे.
चित्रपटांवरील उत्कृष्ट समीक्षात्मक पुस्तक या श्रेणीत  ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला   स्पेशल मेन्शन पुरस्कार प्राप्त झाला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे संसदेत पडसाद

Next Post

इगतपुरी तालुक्यातील बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करावे ; मनसेचे तहसिलदारांना निवेदन

Next Post
IMG 20210322 WA0031 1

इगतपुरी तालुक्यातील बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करावे ; मनसेचे तहसिलदारांना निवेदन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

मणिपूर हिंसाचार प्रकरणात सहभागी असलेल्या या सदस्याला सीबीआयने केली अटक

जून 9, 2025
Untitled 16

मुंबईसह या १८ ठिकाणी ईडीने टाकले छापे….७ लाख जप्त, २२ बँक खाते गोठवले

जून 9, 2025
dhanushayban

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी…

जून 9, 2025
Untitled 23

ठाकरे गटाला मोठा धक्का…डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 9, 2025
bharat gaurav tourist train 1024x683 1

छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ रवाना…या ठिकाणी देणार भेटी

जून 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आलेल्या संधी सोडू नये, जाणून घ्या, सोमवार, ६ जूनचे राशिभविष्य

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011