नाशिक – राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा निफाड तालुक्यातील नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्र, येथे जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व बालकाला लस देऊन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती नाशिक मंडळचे उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. पी. डी. गंडाळ, जिल्ह्या आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दिनेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी एन के चव्हाण, वैद्यकीय अधिकारी श्रीमती प्राची गावित,तसेच गावचे सरपंच जिल्हा परिषद सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले की, राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम १९९५ साली सुरू झाली. आज पोलिओमुक्त भारत देश पोलिओ मुक्त होऊन दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भारतामध्ये एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची यश आहे. भारतात नियमित राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवली जाते. यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओची लस ही तोंडावाटे पाजली जाते. मिळालेले हे यश टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या घरातील शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओची लस आजच्या रविवारी म्हणजे ३१ जानेवारी रोजी पाजणे अत्यंत गरजेचे आहे. नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी. गांडळ, यांनी पल्स पोलिओ चे महत्व विशद करून सातत्याने चालणाऱ्या पल्स पोलिओ मोहिम ही चांगल्या प्रभावीपणे राबवल्यामुळे आपण हे यश मिळवले आहे. त्याबद्दल आरोग्य विभागाचे अभिनंदन करून बालकांना पोलिओ डोस पाजून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर यांनी लोकांना संबोधित करत असताना सांगितले की covid-19 च्या महामारीमध्ये आरोग्य विभागाने अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे. सतत अविरत हा विभाग काम करत असतो. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेस सारख्या मोहिमा व इतर आरोग्य विषयक योजना सतत राबवत असतो. त्यांच्या कामाचं कौतुक करणे अत्यंत गरजेचे आहे. अत्यंत तळागाळात जाऊन आरोग्य सेवक ,सेविका ,डॉक्टर्स, आशा अंगणवाडी कार्यकर्ती नियमित काम करताना मी स्वतः बघतो आहे. त्यांचे काम अत्यंत मोलाचे असून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. जिल्हास्तरीय राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन झाले असे जाहीर करून या कार्यक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सार्जंळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व सीएचओ, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका, आरोग्य सेवक सेविका, आशा यांनी परिश्रम घेतले.