नाशिक- शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केेल्याची माहिती शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली. पश्चिम विधानसभा अध्यक्ष नितीन बाळा निगळ यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, अशोक सावंत,जेष्ठ पदाधिकारी मनोहर बोराडे, जीवन रायते, जय कोतवाल, निलेश भंदुरे,रामदास मेदगे,कमलेश कांडेकर, सुनिल घुगे, संतोष भुजबळ,समाधान तिवडे,भावेश निर्वाण उपस्थित होते.
या प्रवेश सोहळ्याप्रसंगी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले की, प्रवेश घेतलेल्या या कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अधिक बळकटी प्राप्त होणार असून नाशिक शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस हे नाशिक शहर व परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवितात. तसेच नाशिककरांचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेस कायम अग्रेसर असते. या दृष्टीने नाशिक शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाची ताकद सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या वाढत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
यावेळी सनी रॉय , खुशाल खैरनार , श्रेयस इमानदार, रुपेश बैरागी ,शुभम महाजन, विठ्ठल सव्वाशे , कार्तिक भोसले, राहुल रायते,अरविद पैठणकर, कुणाला पाटील दादु बोरसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.