नाशिक – राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहर या दिवाळी निमित्त अनोखा उपक्रम राबविणार आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिका-यांकडून आपल्या भागातील गोरगरीब गरजू महिलेला एक पणती, एक साडी भेट देऊन त्यांची दिवाळी साजरी करणार आहे. हातात घेऊनी हात, करू कोरोना वर मात, दिवाळीची वाढवू गोडी, गरजू महिलेला देऊ साडी. हा संदेश यातून समाजाला राष्ट्रवादी महिला देणार आहे.
दिवाळीच्या या सामाजिक उपक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्ष नगरसेविका सुषमा पगारे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष पुष्पा राठोड, मध्य विधानसभा अध्यक्ष रंजना गांगुर्डे, सिडको विभागीय अध्यक्ष सुवर्णा कोठावदे, संगिता सानप, सातपूर विभागीय अध्यक्ष अपेक्षा अहिरे, पूर्व विभागीय अध्यक्ष आसिया शेख, सलमा शेख, पश्चिम विभागीय अध्यक्ष संगिता गांगुर्डे,पंचवटी विभागीय अध्यक्ष सरिता पगारे, नासिक रोड विभागीय अध्यक्ष रूपाली पठारे, शाकेरा शेख, शहर महिला पदाधिकारी मिनाक्षी गायकवाड, वैशाली ठाकरे, स्वाती बिडला, लता चौधरी, भारती जाधव, बबिता सोनवणे, पुनम शहा, संगिता अहिरे, अर्चना श्रीवास्तव, अर्चना कोथमिरे, सुनिता थिगळे, मिनाक्षी घोडके, कौसर काझी, संगिता पाटील आदि महिला प्रयत्नशील आहेत.
या उपक्रमाबाबत बोलतांना शहराध्यक्ष अनिता भामरे म्हणाल्या की, कोरोना रोगाने थैमान घातले. दुर्दैवाने भारतात महाराष्ट्रामध्ये कोरोना रोगामुळे सर्व सामान्य जनता हवालदिल झाली. संपूर्ण देशभरात या रोगाने अनेक लोकांचे प्राण घेतले तर अनेकांनी आपल्या नोक-या गमावल्या. कित्येकांचे संसार उदध्वस्त झाले. यामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोना मुळे लोकांना सण उत्सव देखील साजरे करता आले नाही. शासनाने जनतेला घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केल्याने आजतरी महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होतांना दिसत आहे ही त्यातली समाधानाची बाब आहे. आजपर्यंत जसे प्रत्येक उत्सव महाराष्ट्रातील जनतेने शांतपणे पार पाडले तसेच आता दिवाळी देखील आम्हाला शांततेत आणि आनंदात पार पाडायची आहे. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारे पर्व म्हणून दिवाळी या सणाचे महत्व अधोरेखित आहे. दिवे लावून किंवा थाळ्या वाजवून कोरोना वर मात करता येणार नाही हे आता आपल्याला कळून चुकले आहे. तेव्हा एकमेकांचे हातात हात घेऊनच यापुढची वाटचाल करावी लागेल हे सत्य नाकारता येणार नाही.