- नाशिक – राष्ट्रवादी महिला काँग्रेस इगतपुरी तालुकाध्यक्ष पदी सौ.जनाबाई नारायण गायकर यांची निवड करण्यात आली. इगतपुरी तालुक्यात आगामी काळात महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणाताई बलकवडे यांच्या मार्गदर्शनाने पक्षाचे मोठ्या प्रमाणात संघटन वाढवेल असा विश्वास व्यक्त करत गायकर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रदेश पदाधिकारी संदीप गुळवे, चेअरमन रयत शिक्षण संस्था मनोज सहाणे, नारायण गायकर, साकुर उपसरपंच ज्ञानेश्वर सहाणे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाणे, देवळाली कॅम्प शहराध्यक्षा सायरा शेख, एन.डी.गोडसे, अशोक पाळदे, निवृत्ती भुसे, शिवाजी पांगरे, सुभाष गायकर, संदीप गायकर, अशोक गायकर, दिनकर गायकर, रमेश गायकर, नामदेव कोकाटे, सोमनाथ सहाणे, संजय बोराडे, संजय जाधव, भाऊसाहेब टिळे, हिरामण गायकर, सोमनाथ पांगरे यांनी अभिनंदन केले.