नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
ट्विटरद्वारे त्यांनी याबाबतची माहिती दिली असुन सध्या ते घरीच उपचार घेत आहेत.
सोमवार १५ मार्च रोजी ॲड.रविंद्रनाना पगार यांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर शुक्रवार रात्री पासुन थोडा ताप आला होता. लस घेतल्यामुळे कदाचित ताप आला असेल असे त्यांना वाटले होते. परंतु ताप कमी होत नसल्याने कोवीडची चाचणी केली असता पॅाझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी. व काळजी घ्यावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी केला आहे.