नाशिक – महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त युवक आमदार निवडून आलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एकमेव पक्ष आहे. शरद पवारांनी आपल्या चाणक्य नीतीने महाआघाडीचे सरकार स्थापन केले असून या यशाची प्रेरणा आता इतर राज्य घेऊ लागल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले. राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, प्रदेश सरचिटणीस चेतन कासव, शेखर शिंदे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, जय कोतवाल, बाळा निगळ व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी शेख म्हणाले महाविकास आघाडी सरकारमुळे शरद पवारांची उंची देशपातळीवर पोहोचली असून महाआघाडी सरकारच्या यशामुळे शरद पवारांवर दिल्लीत कविता होऊ लागल्या आहेत. कवी संमेलनात भाजपचे प्रवक्ते संदीप परमार हेही पवारांवर कविता करत आहे. विचारांची कुस्ती करणाऱ्या नेत्याच्या चाणक्यनीतीची इतर राज्यातील राजकारणी प्रेरणा घेत असल्याचेही त्यांनी सांगितेल.
सर्वसामान्य नागरिकांसह पक्षातील कार्यकर्त्याला मंत्रालयाची पायरी चढायला लागू नये, याकरिता मंत्रालयातून इतर कामकाज होण्यापेक्षा प्रत्येक दिवशी तीन मंत्री राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात बसवून सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबार सुरु केला. असा उपक्रम करणारा राष्ट्रवादी हा पहिलाच पक्ष आहे. राष्ट्रवादी पक्षातील ५४ पैकी २६ आमदार पहिल्यांदा विधान सभेतील सभागृहात गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वात तरुण पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आगामी काळात नवीन नेतृत्व घडविण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असून यात युवकांना मोठी संधी असल्याचेही शेख यांनी सांगितले.
या बैठकीत संदीप भेटे, नवराज रामराजे, राजू पवार, संदीप गांगुर्डे, मुकेश शेवाळे, प्रणव सोनवणे, दीपक पाटील, विशाल गायकर, संतोष भुजबळ, डॉ.संदीप चव्हाण, जयराम शिंदे, भूषण शिंदे, प्रफुल्ल पवार, संदीप खैरे, रोहित जाधव, भूषण गायकवाड, राहुल पाठक, कुलदीप जेजुरकर, सत्यम पोतदार, निलेश भंदुरे, तुषार दिवे, सोनू वायकर, तौसीफ मणियार, सुनिल घुगे, रितेश जाधव, संतोष जगताप, अक्षय काहंडळ, करण आरोटे, निवृत्ती निंबेकर, भाऊसाहेब सूर्यवंशी, योगेश पाटील, अमोल गांगुर्डे, दत्तू पवार, कल्पेश कांडेकर, विक्रम जगताप, योगेश सोनवणे, अमेय मोडक, निखील आहेर, रजत आहेर, अमोल सूर्यवंशी, विशाल वाघ, अरब शकील, कृष्णा काळे, शुभम पेंढारे, राहुल बागुल, किशोर खरोटे, विजय हिरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.