जळगाव – अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असतांना माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या खाजगी वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. वाहनात खडसे सोबत त्यांचेही स्वीय सहायक होते. सुदैवाने कुणालाही काहीही दुखापत झाली नाही. रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास धरणगाव- जळगाव महामार्गावर ही घटना घडली.
या अपघातबाबत खडसे यांनीच टि्व्ट करत माहिती दिली. गाडीचा वेग कमी असल्याने आणि चालकाने प्रसंगावधाने आणि आपल्या आशिर्वादाने आम्ही सुखरुप आहोत. कोणालाही इजा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. अमळनेर येथे विविध विकास कामांचा उदघाटनासाठी गृहमंत्री अनिल देशमुख दौ-यावर होते. या कार्यक्रमाला खडसे यांनी सुध्दा हजेरी लावली. कार्यक्रम संपल्यानंतर जळगावकडे येतांना हा अपघात झाला.