दिंडोरी – नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते व कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी ओझरखेड व वणी येथे कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेत युवक व शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. ओझरखेड येथे संजय पडोळ यांचे हॉटेल श्रीहरी व वणी येथे माजी जिप सदस्य विलास कड यांच्या निवासस्थानी भेट देत पवार यांनी कार्यकर्त्यांशी हितगुज करत प्रश्न जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
माजी जिप सदस्य विलास कड यांनी दिंडोरी तालुक्यातील शेती, दळणवळण व इतर प्रश्नांची माहिती दिली. यावेळी दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बागाईतदार शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र द्राक्ष परिक्षण प्रयोग शाळेची मागणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विलास कड यांनी केली. या सर्व समस्या ऐकल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेत विविध मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी केंद्र शासनाच्या चुकीच्या निर्यात धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, यांसह राष्ट्रवादी दिंडोरी तालुका अध्यक्ष जि प. सदस्य भास्कर भगरे, माजी कादवा संचालक संजय पडोळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शाम हिरे,अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष तौसिफ मनियार,वणीचे उपसरपंच देवेद्र गांगोडे, सदस्य मनोज शर्मा, मनोज थोरात, विजय बर्डे, रविभाऊ सोनवणे, आबा देशमुख, महेद्र बोरा, नामदेव घडवजे, भास्कर फुगट, प्रकाश खाबिया, प्रकाश कड, रामभाऊ पाटील, मुन्ना मनियार ,ऋषिकेश पडोळ, प्रशांत कड, राजेंद्र थोरात, संजय वाघ, प्रकाश वाघ, सुनिल बर्डे, कारभारी कड, जमिर शेख, वणी शहर रा. कॉ. अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष सलिम मनियार, वणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन मातेरे, शरद महाले आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.