मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राबवण्यात येत असलेल्या जनतादरबार उपक्रमांतर्गत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. येथे भेटीसाठी आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निरसन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.