नवी दिल्ली – ऐतिहासिक राष्ट्रपती भवन पाहण्याची इच्छा असलेल्यांसाठी खुषखबर आहे. राष्ट्रपती भवन सामान्य जनतेसाठी येत्या शनिवारपासून म्हणजे दिनांक ६ फेब्रुवारी पासून पुन्हा खुले होणार आहे. कोविड-१९ मुळे गेल्या वर्षी १३ मार्च पासून ते बंद करण्यात आले होते. शनिवार आणि रविवारी (सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस सोडून) ते खुले रहाणार आहे. अभ्यागतांना https://presidentofindia.nic.in किंवा https://rashtrapatisachivalaya.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आँनलाईन पध्दतीने आपल्या भेटीची आगाऊ नोंदणी करता येईल. पूर्वीप्रमाणेच ५० रुपये जुजबी फी यासाठी आकारली जाईल.
शारिरीक अंतराच्या निकषानुसार १०.३०, १२.३०, ४.३० या वेळात आगाऊ नोंदणी नक्की करता येईल. जास्तीत जास्त २५ जणांना एका निर्धारित वेळी प्रवेश दिला जाईल. भेटीदरम्यान अभ्यागतांना मास्क घालणे, शारिरीक अंतर पाळणे या कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल, असे राष्ट्रपती भवन प्रशासनाने कळविले आहे.