नवी दिल्ली – थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती आठवडाभरापूर्वीच साजरी करण्यात आली असून एक आठवडाही उलटत नाही तोच आता राष्ट्रपती भवनात लावलेल्या त्यांच्या पोट्रेट वरून वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर हे चित्र चर्चेत आले आहे. कारण राष्ट्रपती भवनात लावलेले हे चित्र नेताजीऐवजी एका अभिनेत्याचे असल्याचे सांगण्यात येत आहेत.
२०१९ मध्ये प्रोसेनजित हा अभिनेता नेताजींवरील बायोपिकमध्ये सुभाष चंद्र बोसच्या भूमिकेत दिसला होता.
नेताजींचा फोटो बाबत व अभिनेत्याच्या छायाचित्रा संबंधीचे आरोप भाजपाच्या नेत्यांनी फेटाळून लावले आहेत. भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, ज्या फोटोवरून वादविवाद पसरला आहे, तो फोटो मात्र प्रोसेनजितसारखा नाही आणि त्याबद्दल अनावश्यक वादंग केले आहे दुसरीकडे, नेताजींचे पुतणे आणि भाजप सदस्य चंद्र कुमार बोस यांनीही ट्वीटमध्ये लिहिले आहे की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भवनात जी पोर्ट्रेट लावली आहे, ती नेताजींच्या मूळ छायाचित्रांवर आधारित कलाकाराने बनविलेली प्रतिमा आहे. चंद्र कुमार बोस यांनीही आपल्या ट्विटमध्ये नेताजींचे जुने चित्र शेअर केले असून त्या आधारे हे चित्र तयार केले गेले असल्याचे म्हटले आहे.
तर दुसरीकडे टीएमसीचे खासदार महुआ मोईत्रा यांनीही ट्वीट केले की, राम मंदिरात ५ लाखांची देणगी दिल्यानंतर राष्ट्रपतींनी नेताजींना प्रसेनजितच्या रूपातील पोर्ट्रेटचे अनावरण करून सन्मानित केले. सोशल मीडियात अनेक जणांनी त्या चित्राबद्दल भाष्य केले. दरम्यान, श्रीजित मुखर्जी यांनीही ट्विट करुन एक चित्र शेअर केले असून त्या चित्राच्या आधारे बनविण्यात आले असल्याचे लिहिले आहे.