नवी दिल्ली – कोरोनामुळे १३ मार्च पासून बंद ठेवण्यात आलेले राष्ट्रपती भवन वस्तुसंग्रहालय संकुल येत्या ५ जानेवारीपासून जनतेसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. हे संकुल सोमवार आणि सरकारी सुट्यांचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी खुले राहील.
पूर्वीप्रमाणेच प्रतिव्यक्ती रु. ५०/- इतके नाममात्र नोंदणी शुल्क आकारले जाईल. पूर्वी उपलब्ध असलेली प्रत्यक्ष जागेवर नोंदणी करण्याची सुविधा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यासाठी आगाऊ नोंदणीची चार सत्रे निश्चित करण्यात आली आहेत. सकाळी ९.३० ते ११.००, ११.३० ते दुपारी १.००, दुपारी १.३० ते ३.००, दुपारी ३.३० ते संध्याकाळी ५.०० या वेळांमध्ये प्रत्येक सत्रामध्ये केवळ २५ अभ्यागतांनाच प्रवेशाची परवानगी दिली जाईल. या भेटीदरम्यान अभ्यागतांना मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे, आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे या कोविडविषयक मार्गदर्शक नियमांचे पालन करावे लागेल. कोरोनाचा सर्वात जास्त धोका असलेल्या गटातील व्यक्तींना प्रवेशाची अनुमती नसेल.
राष्ट्रपती भवन वस्तुसंग्रहालय संकुल हे एक घटनांवर आधारित कहाणी सांगणारे वस्तुसंग्रहालय असून त्यामध्ये कला, संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि इतिहासाचे प्रतीक असणाऱ्या अतिशय दुर्मीळ आणि मौल्यवान पुरातन वस्तू पाहायला मिळतात. याविषयीचा अधिक तपशील https://rbmuseum.gov.in/. या संकेतस्थळावर पाहता येईल.
या वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यासाठी अभ्यागतांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी, खालील संकेतस्थळांना भेट द्यावी
https://presidentofindia.nic.in
किंवा
https://rashtrapatisachivalaya.gov.in/
किंवा